पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आचार्य अत्रेंना अभिवादन

136

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आचार्य प्र. के. अत्रे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमदिर येथे झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या सुजाता पालांडे, सहाय्यक आयुक्त संदिप खोत, अण्णा बोदडे, आचार्य अत्रे रंगमंदिराचे प्र. व्यवस्थापक विजय घावटे, उद्यान निरीक्षक जयदेव पटेल, जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक रमेश भोसले आदी उपस्थित होते.