पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘आपत्ती व्यवस्थापन पथक’ पुरग्रस्त भागात कार्यरत

66

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील १२० जणांचे मदत पथक आज सकाळ पासून सांगली, मिरज परिसरात कार्यरत झाले. गावोगावी साफसफाई, जंतुनाशक फवारणी, आरोग्य तपासणीसह विविध मदत या पथाकामार्फत केली जाणार आहे. पथकामध्ये सहा.आयुक्त बाळासाहेब खांडेकर, सह शहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप फड, डॉ. उल्पेश महाजन, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल. पिंपरी चिंचवडचे कोरोना योद्धा स्वयंसेवक कुणाल साठे, कुणाल सातव, प्रवीण कुदळे तसेच 10 जणांचे वैद्यकीय पथक, अग्निशमन पथक,८ आधुनिक सफाई यंत्रणा पथक, ८ सर्पमित्र, ३० योद्धा स्वयंसेवक, १८ वाहने, इ.चा समावेश आहे. सदर पथक हे जिल्हाधिकारी, सांगली आणि मनपा आयुक्त,सांगली यांचे सूचनेनुसार पुरबाधित सांगली महापालिका आणि ग्रामीण भागात ७ दिवस कार्यरत राहणार आहे. पिंपरी चिंचवडच्या या मदत पथकाबद्दल सांगलीकरांनी समाधान व्यक्त केले.

WhatsAppShare