पिंपरी-चिंचवड मध्ये आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला कोरोना बाधितांची संख्या १२ वर

228

पिंपरी, दि.२० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. आज (शुक्रवारी) कोरोनाचा आणखी एक रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळला आहे. बाधितांची संख्या १२ वर गेली आहे. संबंधित रुग्ण हा फिलिपिन्स येथून प्रवास करून आलेला आहे.

कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच फ्लूसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांनी किमान १४ दिवस घरामध्येच होम ‘क्वॉरनटाईन’ करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.