पिंपरी चिंचवड मधील ‘या’ कुख्यात गुंडाच्या वाढदिवसाचे बॅनर लावणे चांगलेच पडले महागात

240

पिंपरी, दि. 24 (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहरातील कुख्यात रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅनर लावल्याची घटना गुरुवारी (दि. 22) रात्री नऊ वाजता भोंडवे कॉर्नर, रावेत येथे घडली.

अविष्कार राजू साळुंखे (वय 30, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संजय आंधळे यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील कुख्यात रावण टोळीचा म्होरक्या कै. अनिकेत जाधव याचा शुक्रवारी (दि. 23) वाढदिवस होता. यानिमित्त आरोपी अविष्कार साळुंखे याने गुरुवारी रात्री नऊ वाजता भोंडवे कॉर्नर, रावेत येथे अनिकेत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे मोठे बॅनर लावले. याप्रकरणी शहराचे विद्रुपीकरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare