पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते उद्घाटन

257

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय  कार्यालयाचे उद्‌घाटन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते  आज (बुधवार) स्वातंत्र्यदिनी करण्यात आला. चिंचवड येथील ऑटो कल्सटर कार्यालयासमोर ध्वजारोहण आणि नोंदवहीतील नोंद करुन तसेच कंट्रोल रूमला कॉल करून  पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले.

यावेळी महापौर राहूल जाधव,  खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, आमदार  महेशदादा लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार, नवनियुक्त पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन,  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे,  उपायुक्त नम्रता पाटील, स्मार्तना पाटील, विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, चंद्रकांत अलसटवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.