पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस निरीक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

51

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कोरोना विषाणूने महिनाभरापूर्वी प्रवेश केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिका-यांचा देखील कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. आज (सोमवारी) आयुक्तालयातील दोन पोलीस निरीक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यातील 14 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेले बहुतांश पोलीस संपूर्ण उपचारानंतर कर्तव्यावर देखील हजर झाले आहेत. आयुक्तालयातील चार पोलिसांवर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन हजारांचा टप्पा ओलांडून कोरोना बधितांचा आकडा अडीच हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाशी थेट संपर्क असलेले पोलीस देखील यापासून सुरक्षित राहिलेले नाहीत. आनंदाची बाब ही की, बहुतांश पोलिसांनी कोरोनावर मात केली असून केवळ चार पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत.

WhatsAppShare