पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कामकाज १५ ऑगस्ट पासून सुरु होणार

517

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून उत्सुक्ता लागून राहिलेल्या नवर्निवाचीत पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलिस आयुक्तालयाचे कामकाज १५ ऑगस्ट पासून सुरु होणार असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या गृह विभागाने आज (शुक्रवार) प्रसिध्द केला आहे.

गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी हा आदेश काढला असून त्यामध्ये पोलीस आयुक्त, पुणे शहर व पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करुन पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराकरीत निर्माण करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कामकाज १५ ऑगस्ट पासून प्रत्यक्षात सुरु करण्याची शासन मान्यता देण्यात आली आहे. यामुळे येत्या १५ ऑगस्टला कामकाज सुरु होणार हे निश्चित झाले आहे.