पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कामकाज १५ ऑगस्टपासून; ऑटो क्लस्टरमध्ये आयुक्तालयासाठी पर्यायी व्यवस्था

67

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरासाठी निर्माण करण्यात आलेल्या स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचे कामकाज येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमध्ये पोलिस आयुक्तालयासाठी सुसज्ज कार्यालय सुरू होईपर्यंत चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या कार्यालयातून कामकाज चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेमलोक पार्कमध्ये पोलिस आयुक्तालयाचे कार्यालय सुसज्ज झाल्यानंतर त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.