पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदी आर. के. पद्मनाभन यांची नियुक्ती

196

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून उत्सुक्ता लागून राहिलेल्या नवर्निवाचीत पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलिस आयुक्तालयामध्ये आर. के. पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त आणि अप्पर पोलिस आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली राहणाऱ्या या नवीन पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये दोन परिमंडळे आणि एकूण १५ पोलिस ठाणी समाविष्ट होणार आहेत. नवीन आयुक्तालयासाठी एकूण ४ हजार ८४० पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे शहर पोलिस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरून २ हजार २०७ पदे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित २ हजार ६३३ पदांची निर्मिती तीन टप्प्यांमध्ये करण्यात येईल. यापैकी पहिल्या टप्प्यात १ हजार ५६८, दुसऱ्या टप्प्यात ५५२, तर तिसऱ्या टप्प्यात ५१३ पदांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली होती.

सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रेमलोक पार्कमध्ये आयुक्तालयाचे काम वेघाने सुरु आहे. येत्या १५ ऑगस्टला त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.