पिंपरी-चिंचवड परिसरात काल सकाळ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद

95

 

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड परिसरात काल सकाळ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत जे घडले नाही ते जनता प्रतिसादामुळे घडल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी-चिंचवड शहरात अशी स्मशान शांतता कधीच पाहायला मिळाली नव्हती. मात्र, कोरोना विषाणू आला आणि सर्व काही बदलून गेले.

पिंपरी -चिंचवड शहरात ऐकून १२ बाधित रुग्ण आढळले असून नागरिकांना काळजी घेण्याची आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, सकाळपासून घरातून बाहेर न निघालेल्या नागरिकांनी बरोबर पाच वाजता इमारतीच्या आपआपल्या गॅलरीत येऊन टाळ्या आणि थाळी वादन करण्यास सुरुवात केली.

यामुळे अचानक शांत झालेला परिसरातून थाळ्यांचा आवाज कानावर पडला. हे सर्व पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव, पवनानगर भागात पाहायला मिळाले. सर्वत्र केवळ थाळी आणि टाळ्यांचा निनाद होता. येवढच नाहीत काहींनी शंख वाजवला तर काहींनी फटाक्यांची आतिषबाजी केली. यामुळे परिसरातील वातावरण हे चैतन्यमय झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचच्या सुमारास घराबाहेर येऊन थाळी किंवा शंख वाजवण्याचे देखील आवाहन केले होते.