पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांनी निवड

188

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराची एक महत्त्वाची नियोजन संस्था असलेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल १४ वर्षांनंतर प्राधिकरणाला प्रशासकीय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अध्यक्ष मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाडे यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड केल्याचा आदेश शुक्रवारी (दि. ३१) जारी केला आहे.