पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट संघ जाहीर

85

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) : राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट खुला वयोगटात महिला आणि पुरुष गटासाठी टेनिस क्रिकेट अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड कर्णधारपदी अमिषा पाटील (महिला ) आणि स्वप्निल खोडदे यांची निवड करण्यात आली आहे . पार्वती बाकळे यांची प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे .

या राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक 24 सप्टेंबर 2021 ते 26 सप्टेंबर 2021 रोजी विभागीय क्रीडा संकुल , नाशिक येथे होणार आहे.

महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट अससोसिएशन यांच्या मान्यतेने राज्य सचिव मीनाक्षी गिरी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

पिंपरी चिंचवड महिला संघात अमिषा पाटील (कर्णधार ) श्वेता साळुंखे ( उपकर्णधार ) , श्रद्धा आव्हाड , मधुरा बाफना ,साक्षी सरदार , संचिता सोनावणे , साक्षी महाजन , सिया सूर्यवंशी , माधुरी बनसोडे , अनुजा मोरे , अचला गावडे तर पुरुष संघात स्वप्निल खोडदे (कर्णधार ) , अक्षय कुमार परदेशी(उपकर्णधार ) राजू पवार, साहिल गवारे, रुणाल गवारे, श्रीयश पिंगळे, सुबोध कांबळे, अमित पवार, अंकित कानिटकर,अक्षय भुलाडे, राजा प्रसाद, आशिष मालुसरे , मयूर गोखले या सर्वांची निवड झालेली माहिती संघटनचे पदाधिकारी मृदुला महाजन, सुनीता फडके, तुषार हिंगे आणि ऐश्वर्या साठे ह्यानी दिली .

WhatsAppShare