पिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा

177

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात रविवारी (दि. १९) आयोजित केलेला कलावंत स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळेत विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी विविध क्षेत्रातील कलावंतांची पी.डब्लू.डी. मैदान येथून निळु फुले नाट्यगृहपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये नामांकीत कलावंतीनी आपली उपस्थिती दर्शवित सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर केली. तसेच उद्घाटन समारंभानंतर सांस्कृतीक कार्यक्रमांमधून सुप्रसिद्ध सिने, नाट्य व लोक कलेच्या विविध क्षेत्रातील कलावंतांच्या कलेचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्राची लोकधारा, भव्य लावणी महोत्सव, ओल्ड इज गोल्ड, संगीत रजनी यांसह विविध वाद्यवृंदांच्या साथसंगतीने अनेक कलाकारांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

यावेळी पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील विविध कलाकिर्तीतले नामांकित कलावंत गायक, मंडळाचे अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते यांच्यासह रसिक श्रोते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.