पिंपरी चिंचवडला उद्रेक, एका दिवसात ५८१ कोरोना पॉझिटिव्ह

79

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. एकाच दिवसात तब्बल ५८१ रुग्णांची वाढ शहरात झाली आहे. कोरोना बाधितांची संख्या आता ४,८६१ झाली आहे. गेले चार दिवसांपासून ३०० ते ३४४ अशी सलग वाढ होत होती, पण आज एकदम जवळपास दुप्पटीने वाढलेले कोरोना रुग्ण हा चिंतेचा विषय आहे. शहराबाहेरील आज बाधित आलेल्या रूग्णांची संख्या ८ आहे.

कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या २,९०६ तर उपचार सुरू असलेले एकूण १,८६३ कोरोना रुग्ण आहेत. त्यामध्ये पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्णांची संख्या ११ तर पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण १०४ आहेत. मृतांची संख्या  एकूण मयत ९९ तर त्यामध्ये शहरातील एकूण मयतांची संख्या ६७ आहे. शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या ३२ आहे. कोरोना संशयितांचे प्रतीक्षा अहवाल १,३९२, तर एकूण सॅम्पल ६,७३९ घेतले आहेत.

आजवर अहवाल प्राप्त २५,३४७, तर घरात अलगीकरण २९,३७५ लोकांचे केले आहे. आज रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ६१४ आहे, असे महापालिकेच्या अहवालात म्हटले आहे. महापालिकेने सर्वेक्षण केलेल्या नागरिकांची संख्या ६५ लाख ४८ हजार ५४० आहे. कोणत्या भागातील नागरिक कोरोना बाधित आले आहेत याची यादी महापालिकेने दिलेली नाही.

WhatsAppShare