पिंपरी चिंचवडमध्ये वाहन चोरीचे सत्र सुरूच

59

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – भोसरी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी आणि कार अशी दोन वाहने चोरून नेली. वाहनचोरीचे दोन्ही प्रकार रविवारी (दि. 20) उघडकीस आले आहेत. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गणेश महादेव वायाळ (वय 35, रा. पुणे-नाशिक हायवे, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची चार लाख रुपये किंमतीची कार (एम एच 14 / जी यु 3912) शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास इंद्रायणीनगर भोसरी येथील मिनी मार्केट कॉम्प्लेक्स समोर सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी कार चोरून नेली. रविवारी सकाळी सात वाजता हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

प्रतिक जगन्नाथ घोलप (वय 24, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 42 / ए डब्ल्यू 7330) शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रविवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare