पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीच्या विरुध्द दिशेने वाहन चालवल्यास आता सहा महिने कैद

138

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन विरुद्ध दिशेने वाहन चालवत अपघाताला आमंत्रण देणाऱ्या, तसेच स्वत:सह दुसऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी  पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. आयुक्तांनी आज (बुधवार) याबाबत संबंधीत पोलिसांना आदेश दिले आहेत.