पिंपरी-चिंचवडमधील 22 शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव

551

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12(1) सी अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना आरक्षित 25 टक्के जागांवरील प्रवेशास स्तर ठरविण्यात आला आहे. आरटीई 25 टक्के अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अनेक शाळा प्रवेश नाकारत आहेत. आरटीई 25 टक्के प्रतिपुर्तीची रक्कम अदा झाली नाही म्हणून शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवत आहेत. शिक्षण हक्क कायद्यातील तरतूदीनूसार कोणतीही पुर्व सूचना न देता पिंपरी-चिंचवडमधील 22 शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक (प्राथ) विभागाकडे सादर करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणा-या संस्थाना चांगलाच दणका बसणार आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत शाळेच्या सरल पोर्टलवर मागील वर्षी नमूद विद्यार्थी संख्येनूसार आरटीई अलोटमेंट करण्यात आली आहे. त्यानूसार प्रत्येक शाळेने आरटीई 25 टक्के अलोंट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक वर्षी शाळा स्तरावर (रेग्यूलर अॅडमिशन) विद्यार्थी संख्येने सरल पोर्टलवर आरटीई अलोंट विद्यार्थी पुढील वर्षी प्रवेश देण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर प्रत्येक शाळेने योग्य नियोजन करुन अलोंट झालेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्रवेश द्यावा. ही प्रक्रिया 23 जूलैपर्यंत 2021 पर्यंत पुर्ण करावयाची आहे.

अनेक शाळा आरटीई पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ करत आहेत. शाळांनी अद्याप ही प्रवेश व प्रवेश दिनांक संबंधित पालकांना दिलेली नाही. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी संस्था चालकांना सुचना देवून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. तरीही काही शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहेत. त्या शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत. तसेच उच्च न्यायालयाच्या 2 एप्रिल 2018 रोजीच्या आदेशानूसार आरटीई 25 टक्के प्रतिपुर्तीची रक्कम अदा झाली नाही. या कारणाने प्रवेश प्रक्रिया अडथळा निर्माण करीत आहे. संबंधित विद्यार्थ्याचे शैक्षणिक नूकसान झाल्यास बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनयम 2009 अन्वये शिक्षण हक्क कायद्याचा भंग केल्यावरुन योग्य ती कारवाईची नोटीस दिली आहे. तसेच कोणतीही पुर्व सुचना न देता आपल्या शाळेच्या मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक प्राथमिक विभागाकडे दाखल करण्यात येत आहे.

शहरातील या शाळांची मान्यता होणार रद्द –
लिटल अॅन्जस्ल पब्लिक स्कूल पिंपरी, ज्ञानदा परी विद्यामंदिर पिंपरी, पी.के.इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल पिंपळे सौदागर, द स्टिपींग स्टोन स्कूल थेरगाव, एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल रहाटणी, मातृ विद्यालय, मातृसेवा विद्यामंदिर चिंचवड, सरस्वती विद्यामंदिर पिंपळे गुरव, द शिष्या स्कूल, विद्या व्हॅली नॉर्थ ज्यूनियर कॉलेज, आकुर्डी, प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कूल, प्रियदर्शनी हायस्कूल भोसरी, प्रियदर्शनी इंग्लिश प्राथमिक स्कूल इंद्रायणीनगर, प्रियदर्शनी स्कूल सीबीएससी इंद्रायणीनगर भोसरी, कॅब्रीज इंटरनॅशनल स्कूल चिंचवड, व्हीआयबीएस पब्लिक स्कूल विकासनगर किवळे, ज्योती इंग्लिश स्कूल, अभिषेक प्राथमिक विद्यालय शाहूनगर, प्रियदर्शनी प्राथमिक स्कूल मोशी, अभिषेक इंटरनॅशनल स्कूल मोशी, एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल चिखली, एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल मोरवाडी.