पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी राहुल जाधव, तर उपमहापौरपदी सचिन चिंचवडे; राष्ट्रवादीचा पराभव

1038

 पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतली नाही. त्यामुळे या दोन्ही पदासाठी शनिवारी (दि. ४) निवडणूक घेण्यात आली. सत्ताधारी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना ८०, तर राष्ट्रवादीला ३३ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक गैरहजर राहिले. भाजपचेही ३ नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे महापौरपदी भाजपचे राहुल जाधव विजयी झाले. उपमहापौरपदासाठीही घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपच्या सचिन चिंचवडे यांना ७९, तर राष्ट्रवादीला ३ मते मिळाली. त्यामुळे उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांनी निवड झाली. या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी भाजपला मतदान केले. तर शिवसेनेचे ९ नगरसेवक तटस्थ राहिले.