पिंपरी चिंचवडकर आता सकाळी फिरायला जाऊ शकता ईदला घरातूनच नमाज अदा करा

120

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी याचे मार्गदर्शन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सकाळी फेसबूक लाईव्ह मधून केले. नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला. आता सकाळी फिरायला जाऊ शकता, असेही त्यांनी सांगितले. ईद साठी घरातूनच नमाज अदा कऱण्याचे आवाहन त्यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहराला रेड झोन मधून वगळण्यात आले आहे. त्यानंतर आज पासून शहरातील बहुतांश सर्व दुकाने सुरू झाली आहेत. आता नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत आयुक्तांनी सांगतिले. आयुक्त म्हणाले, कुठलाही व्यवसाय असो उपस्थिती ५० टक्केच अपेक्षित आहे. मास्क सक्तीचा आहे. दोन व्यक्तीमधील अंतर किमान असले पाहिजे. व्यावसायाच्या ठिकाणी यापुढे सॅनिटायझर सक्तीचा आहे. आता सार्वजनिक वाहतूक सुरू करत आहोत, मात्र नियम पाळावेच लागतील. एका सिटवर एकच प्रवासी बसेल. दुचाकीवर एकच व्यक्ती प्रवास करेल. रिक्षातून दोनच लोक बसू शकतात.

शहरातील व्यायामशाळा आता टप्याटप्याने सुरू कऱणार आहोत. एकच व्यक्ती व्यायाम करेल अशाच व्यायामांना परवानगी आहे. सांघिक खेळांना परवानगी नाही.शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, रेस्टॅरंट, खानावळी , बार बंदच राहतील. सर्व कार्यक्रम बंद असतील. लग्न, मयत यांना फक्त ५० जणांचीच उपस्थिती आवश्यक आहे.
शहरात ४७ कंन्टेमेंट झोनची यादी दिली आहे. तिथे असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. या झोनमधील नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि अगदीच गरज असेल तर सकाळी १० ते १२ या वेळातच बाहेर पडावे, असे हर्डीकर यांनी सांगितले.

WhatsAppShare