पिंपरी आणि चिंचवड येथील महाविद्यालयांबाहेर टवाळक्या करत उभे असलेल्या ४२ तरुणांवर कारवाई करुन पोलिसांनी दिली समज

390

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरीतील नव महाराष्ट्र आणि चिंचवड मोहननगर येथील प्रतिभा महाविद्यालयाचे विद्यार्थी नसताना देखील शाळेच्या आवारात आणि गेट समोर उभे राहून टवाळक्या करणाऱ्या ४२ तरुणांना आज (बुधवार) सकाळी पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी या तरुणांवर मुंबई पोलीस अधिनियमान्वये कारवाई केली. तसेच त्यांचे पालक आणि नातेवाईकांसमोर संबंध नसताना पुन्हा जर शाळा महाविद्यालयांसमोर उभे राहिलेले आढळल्यास कडक कारवाई करण्याची तंबी दिली आहे.

शाळा महाविद्यालयात अॅडमिशन नसताना देखील परिसरात आणि गेट समोर उभे राहून टवाळक्या करणाऱ्या मुलांवर वचप बसावा आणि त्या ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांवर आळा बसावा म्हणून ही धडक कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी पिंपरीतील नव महाराष्ट्र आणि चिंचवड मोहननगर येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या गेटसमोर आणि आवारात शाळा महाविद्यालयाशी संबंध नसता उभे असलेल्या तरुणांकडे ओळखपत्र नसलेल्या ४२ जणांना ताब्यात घेतली. त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली. तसेच त्यांना पुन्हा शाळा महाविद्यालयत आवारात दिसल्यास कडक कारवाईची तंबी देण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाच्या वाहनांचे क्रमांक महाविद्यालय परिसरातील बेशिस्तपणे उभ्या असलेल्या अशा एकूण ३८ वाहनांची यादी करुन पिंपरी वाहतूक विभागास कारवाईसाठी पाठवली आहे. तसेच शाळा महाविद्यालय परिसरात होणारे गैर प्रकार रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची अचानकपणे केली जाणारी कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती पिंपरी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली. नागरिकांनी शाळा महाविद्यालय परिसरात होणाऱ्या गैर प्रकाराची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.