पिंपरीत २३ वर्षीय पादचारी महिलेचा विनयभंग

222

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – रस्त्याने पायी निघालेल्या २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रविवारी (दि. १) रात्री अकराच्या सुमारास पिंपरीतील भाटनगर परिसरात घडला.

या प्रकरणी परशुराम टोणपे (रा. भीमनगर, पिंपरी) यांच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला रस्त्याने पायी जात होती. यावेळी परशुराम यांनी महिलेस ढापणे असे म्हणाला. शिवायी विचारणा केली म्ह्णून शिवीगाळ करुन विनयभंग केला. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.