पिंपरीत हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांचा सत्कार

79

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांचा जनाधिकार संघटन आणि पिंपरी चिंचवड सलमानी महिला आघाडी यांच्यावतीने आज (मंगळवारी) सत्कार करण्यात आला.

यावेळी जन अधिकार संघटना अध्यक्ष मजीद  शेख व  पिंपरी चिंचवड सलमानी महिला आघाडीच्या अध्यक्षा सईदा शेख त्याप्रमाणे भाविक यात्री भक्त अशरफ खान, रुबीना खान, वहीदा शेख, बरकत अली शेख, सईदुल निशा शेख, सिद्दीक शेख, रफीक शेख, तरन्नुम शेख, अजीत शेरे, रमेश जगताप, शाहजहां शेख, आलम शेख आदी उपस्थित होते. अॅड. सुशीलकुमार डूमने यांनी या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन केले.