पिंपरीत सिमेंटचा गट्टू डोक्यात मारुन रिक्षाचालकाला जबर मारहाण

119

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – रिक्षा लावण्यावरुन झालेल्या वादातून दोघा रिक्षाचालकांनी मिळून एका रिक्षाचालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि.७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपरी आंबेडकर चौकातील रिक्षा स्टॅण्डवर घडली.

मेहबुब गुडलाल चिकनगिरी (वय २३, रा. कासारवाडी, बिलाल मशीदजवळ, निराबाई झोपडपट्टी) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सुनिल म्हेत्रे आणि कैलास म्हेत्रे (दोघे रा. खराळवाडी, पिंपरी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मेहबुब आणि दोघे आरोपी हे रिक्षाचालक आहेत. शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपरी आंबेडकर चौकातील रिक्षा स्टॅण्डवर, रिक्षा लावण्याच्या कारणावरुन त्यांच्या भांडण झाले. यावर दोघा आरोपींनी मेहबुबला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन गंभीर जखमी केले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक निकम तपास करत आहेत.