पिंपरीत सायकल चोरीला गेल्याने अल्पवयीन मुलाने पाच दुचाक्या जाळल्या

623

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – सायकल चोरीला गेल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने पेट्रोल टाकून पाच दुचाक्या जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.३०) रात्री उशीरा तीनच्या सुमारास पिंपरीमधील लिंकरोड येथील पत्राशेड येथे घडली.

पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशीरा तीनच्या सुमारास पिंपरीतील लिंकरोड येथे असलेल्या पत्राशेड येथील घराबाहेर उभ्या केलेल्या तब्बल पाच दुचाक्या एका अल्पवयीन मुलाने पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र अग्निशमन दलाचे बंब घटना स्थळी पोहचे पर्यंत पाचही दुचाक्या पूर्णपने जळून खाक झाल्या होत्या. पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता त्याची सायकल चोरीला गेल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.