पिंपरीत विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

237

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – विवाहित महिलेने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (बुधवार) दुपारी एकच्या सुमारास पिंपरी गावात घडली.

हेमा अविनाश कुदळे (वय ३०, रा. स्वप्नपूर्ती निवास, पिंपरीगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हेमा कुदळे आज बुधवार दुपारी एकच्या सुमारास घरामध्ये त्यांच्या एक वर्षाच्या मुलासोबत होत्या. त्यांची सासू व पती काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी एक वर्षाचे बाळ समोर असताना हेमा यांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हेमा यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.  पिंपरी पोलीस तपास करत आहेत.