पिंपरीत लोकलच्या धडकेत अज्ञाताचा मृत्यू

143

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – रुळ ओलांडताना लोकलने दिलेल्या धडकेत अज्ञाताचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास पिंपरी डेअरी फार्म येथे घडली.

पिंपरी लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी चारच्या सुमारास ही व्यक्ती पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे रुळ ओलांडत होती. यावेळी लोकलने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. मृताची ओळख अद्याप पटली नसून वय अंदाजे ३५ वर्षे आहे. चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे वाढलेले, बांधा सडपातळ, रंग काळा असे वर्णन आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा हिरव्या फुलांच्या रेषा असलेला शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट आहे. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी पिंपरी लोहमार्ग पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.