पिंपरीत महिलेचा जळून मृत्यू

32

पिंपरीतील आंबेडकर कॉलनीमध्ये एका महिलेचा जळून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (मंगळवार) सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

गीता जगताप (वय ५५, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) असे आगीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी दुपारी चारच्यासुमारास पिंपरी येथील आंबेडकर कॉलनीमध्ये एका घराला आग लागली.  या आगीमध्ये संपूर्ण घर जाळून खाक झाले. आगीमध्ये गीता जगताप या गंभीररीत्या भाजल्या व त्याचा मृत्यू झाला. मात्र महिलेने स्वतःला पेटवून घेतले, की घराला आग लागल्याने तीचा जळूण मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.