पिंपरीत वसुली अधिकाऱ्याने केला २४ लाखांचा अपहार

205

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – वसुलीतून जमा झालेली २४ लाख ८१ हजार ३०१ रुपयांची रक्कम शासकिय तिजोरीत भरना न करता अपहार केल्या प्रकरणी शासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या एका वसुली अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपहार १ एप्रिल २०१२ ते ४ ऑगस्ट २०१८ दरम्यान पिंपरीतील किर्ती हॉस्पीटल जळळी विंग वाघेरे पार्क येथे घडला.

या प्रकरणरी प्रकाश कुलकर्णी (वय ४१, रा. पिंपळेनिलख) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर धमेंद्र ब्रिजलाल सोनकर (वय ४५, रा. विंग वाघेरे पार्क, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमेंद्र हे महाराष्ट्र शासनाचे विश्वस्त आणि एजंट म्हणून काम करतात. कराच्या वसूलीचे काम त्यांच्यामागे असते. धमेंद्र यांनी १ एप्रिल २०१२ ते ४ ऑगस्ट २०१८ च्या दरम्यान सुमारे २४ लाख ८१ हजार ३०१ रुपये ऐवढी कराची रक्कम वसूल केली होती. दरम्यान, वसूलीची रक्कम शासनाच्या तिजोरीत भरणे अपेक्षित होते. मात्र, धमेंद्र यांनी ही रक्कम शासकीय तिजोरीत न भरता विक्रीकराचा अपहार केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.