पिंपरीत महाडाच्या बांधकाम साईटवरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू

119

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – महाडाच्या बांधकाम साईटवरील इमारतीच्या १९ व्या मजल्यावर प्लास्टरचे काम करताना क्रेनचा ब्रेक फेल झाल्याने एका कामगाराचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास पिंपरीतील म्हाडाच्या साईटवर घडली.

राजकुमार अशोक घोसले (वय २४, रा. छत्तीसगड) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास पिंपरीतील म्हाडाच्या साईटवरील इमारतीच्या १९ व्या मजल्यावर राजकुमार हे क्रेनवर उभे राहून प्लास्टरचे काम करत होते. यावेळी क्रेनचे अचानक ब्रेक फेल होवून ती खाली कोसळली. याबरोबरच राजकुमार ही खाली कोसळले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत इतर दोन कामगार देखील जखमी झाले आहेत. सध्या त्यांनी प्रकृती स्थीर आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.