पिंपरीत भाई वैद्य, शरद राव यांच्या स्मरणार्थ पाणपोई

33

पिंपरीतील इंदिरा गांधी पूलजवळील होंडा शोरूम समोर  फुले शाहू आंबेडकर विचार प्रतिष्ठान आणि कष्टकरी कामगार पंचायत वतीने जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य आणि ज्येष्ठ कामगार नेते शरद राव त्यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्‌घाटन नगरसेविका कोमल मेवानी आणि आरटीओ अधिकारी सुबोध मेडसीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी  कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, दिपक मेवानी, बी.आर. मुडगुळकर, आशा कांबळे, सोपानराव चव्हाण, प्रल्हाद कांबळे, रमेश शिंदे, इसाक राज, सतिश प्रधान,  हाफिज कुरेशी, दैवत पाटील, जाफर कुरेशी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी नदीम शेख, अकबर शेख, मारुती सोनटक्के, विशाल चंपाकत, नागनाथ तेलंग, वसीम शेख, अप्पा भंडारी, रंगनाथ साळवे, बाळासाहेब सूर्यवंशी, मधुकर थोरात, सुदाम बनसोडे यांनी परिश्रम घेतले.