पिंपरीत भाई वैद्य यांना विविध संस्था, संघटनांतर्फे श्रद्धांजली

68

ज्येष्ठ समाजवादी नेते व राज्याचे माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या जाण्याने कष्टकऱ्यांचे नेतृत्व हरपले, त्यांचा आधारवड गेला, या शब्दांत भाईंना श्रद्धांजली वाहण्यात आली. कष्टकरी कामगार पंचायत तर्फे पिंपरी येथील महात्मा फुले पुतळा येथे आज (गुरूवार ) दुपारी १२ वाजता भाईंना आदरांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्या वर्षा गुप्ते, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, पिंपरी- चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर, समाजवादी कार्यकर्ते बी.आर. माडगूळकर, कष्टकरी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, प्रल्हाद कांबळे आदींनी श्रद्धांजली वाहिली.

बाबा कांबळे म्हणाले की, सत्याग्रहाचे बाळकडू भाई वैद्य यांच्याकडून मिळाले. घरकुलधारक , कष्टकरी, पथारीवाले, रिक्षाचालक यांच्या चळवळीस मार्गदर्शन करणारा नेता आपल्यातून गेला आहे. यावेळी बळीराम काकडे, रमेश शिंदे, धर्मराज जगताप, मल्हार काळे, संभाजी गोरे, विजय ओव्हाळ, आशा कांबळे, नरेंद्र बनसोडे, शोभा शिंदे, हिरा यादव, रवी शेलार आदी उपस्थित होते.