पिंपरीत बेरोजगार तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

422

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरीतील संत तुकारामनगर येथे एका बेरोजगार तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना गुरुवारी (दि. ९) रात्री घडली. मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

राजेश्वर दिनकरराव पाटील (वय २०, रा. संत तुकारामनगर, पिंपरी. मूळ रा. उदगीर, लातूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश्वर सध्या त्याचा मोठ्या भावासोबत (ज्ञानेश्वर पाटील) पिंपरीतील संत तुकारामनगर येथे राहत होता. दरम्यान, राजेश्वर नोकरीच्या शोधात काही दिवसापुर्वी पुण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी (दि. ९) रात्री त्याने एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस तपास करत आहेत.