पिंपरीत प्लायवुडच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना रंगेहात अटक

393

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरीतील सुरेश प्लायवुड या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना पिंपरी पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या हत्यारांसह अटक केली असून एकजण फरार झाला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.५) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपरी भाटनगर लिंकरोड येथील बच्चु अॅण्ड सन्स या दुकानासमोर करण्यात आली.

याप्रकरणी युसुफ मुसा लखाणी (वय ३८), शिवानंद विरेंद्र पांडे (वय ४०), मुर्गेशे वेलु देवेंद्र (वय ४३), कैलाश मथुरा सुर्यवंशी (वय ४७) आणि दिनेश यादव या पाच जणांनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दिनेश हा फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपरीतील भाटनगर लिंकरोड येथील  बच्चु अॅण्ड सन्स या दुकानासमोर पिंपरी पोलीस गस्त घालत असताना त्यांना वरील पाच आरोपी संशयास्पदरित्या उभे असलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केला मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावर पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दरोडा टाकण्याचे सामान आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन चार आरोपींना अटक केले. मात्र त्यातील पाचवा आरोपी दिनेश यादव हा फरार झाला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.