पिंपरीत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून सात जणांना पावने आठ लाखांचा गंडा

185

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून सात जणांना तब्बल पावने आठ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. ही घटना २४ ऑक्टोबर २०१७ ते आजपर्यंत पिंपरी गाव येथील सावता माळी मंदिरा शेजारी असलेल्या शॉप नं.२ येथे झाली.

याप्रकरणी निशा बमरा (वय ४०, रा. गोकुळधाम सोसायटी, पिंपरी) यांनी शांताराम विठ्ठल सपकाळ (वय ४७, रा.काळेवाडी) आणि किशोर महावीर बस्तावडे (वय ३६, रा. शुक्रवार पेठ, पुणे) या दोघांविरोधात  पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शांताराम आणि किशोर यांनी फिर्यादी निशासह सिमरन कैर मिस्त्री, नंदा लक्ष्मण इंगळे, भाग्यश्री जयद्रथ आखाडे, वनिता सुभाष काजळे, निर्मल दर्शनसिंग कुम्मन आणि रुपेश गौतम रिकिबे या सहा जणांना नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी एकूण ७ लाख ७५ हजार रुपयांची आर्थीक फसवणूक केली आहे. आरोपींनी फिर्यादी आणि अण्य सहा जणांना नोकरीस न लावता पैसे देखील परत केले नाही. पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्ष ए.पी.निमगीरे तपास करत आहेत.