पिंपरीत दुर्धर आजाराला कंटाळून ८५ वर्षीय वृद्धाने पेटवून घेत केली आत्महत्या

85

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – दुर्धर आजाराला कंटाळून एका ८५ वर्षीय वृद्धाने पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. १३) मध्यरात्री दीडच्या सुमारास पिंपरी खराळवाडी येथे घडली.

रुपचंद धोंडीराम सुंदेचा (वय ८५, रा. भारतनगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपचंद यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. या आजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी रात्री अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये ते १०० टक्के भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.