पिंपरीत दहा लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण

180

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – दहा लाखांच्या खंडणीसाठी सहा जणांच्या टोळीने व्यावसायिकाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (दि.१३) रात्री सव्वाअकराच्या सुमारास सागर हॉटेल, विशाल ई स्क्वेर थिएटर, पिंपरी येथे घडली.

यज्ञेश विनोद तिलवा (वय ३३, रा. भिगवनकर प्लाझा, फ्लॅट क्र.२०३, शिंदेवस्ती, रावेत) असे अपहरण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किशोर सावंत, दिलीप अवसरमल आणि त्याचे ३ ते ४ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यज्ञेश हे व्यावसायिक आहेत. सोमवार रात्री सव्वाअकराच्या सुमारास आरोपी किशोर सावंत, दिलीप अवसरमल आणि त्याचे ३ ते ४ साथीदारांनी मिळून टोयोटा इटॉस कार (क्र.एमएच/१२/एनबी/०७४९) मधून यज्ञेश यांचे दहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केले. यावर फिर्यादी  यांच्या पतीचे मित्र सचीन जैद आणि दिर या दोघांनी आरोपींनी दिलेल्या कॅनरा बँकेच्या खात्यात अडिच लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक निकम तपास करत आहेत.