पिंपरीत टोळक्यांची दहशत नागरिकांना मारहाण करुन केली वाहनांची तोडफोड

220

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी भाटनगर परिसरातील काही टोळक्यांनी आज (गुरुवार) सायंकाळी सातच्या सुमारास हातात दांडके, दगड घेऊन परिसरात दहशत पसरवण्याच्या हेतून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मारहाण केली. तसेच परिसरातील वाहनांवर दगडफेक करुन नुकसान केले. पोलिस घटना स्थळी पोहचले असून आरोपींचा शोध घेत आहेत.