पिंपरीत घरघुती वादातून एकाला दगडाने जबर मारहाण

135

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – घरघुती कारणाच्या वादातून बाप लेकाने मिळून एकाला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने जबर मारहाण करत जखमी केले. ही घटना शनिवारी (दि.१३) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपरी गांधीनगर येथील हनुमान मंदिराजवळ घडली.

दशरथ ज्ञानोबा रविवारे (वय ३७, रा. हनुमान मंदिराजवळ, कदमचाळ, गांधीनगर, पिंपरी) असे जखमी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कलवाणी दिगंबर दामोदर (वय ४०) आणि त्यांचा मुलगा सागर दिगंबर दामोदर (वय २५, दोघे रा. गांधीनगर, पिंपरी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपरी गांधीनगर येथील हनुमान मंदिराजवळ जखमी दशरथ आरोपी कलवाणी आणि त्यांचा मुलगा सागर या दोघांसोबत घरघुती कारणावरुन वाद झाला. यावर त्या दोघांनी दशरथ यांना लाथाबुक्क्या मारहाण करत डोक्यात दगड मारला. यामुळे दशरथ गंभीर जखमी झाले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. फौजदार कदम तपास करत आहेत.