पिंपरीत कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी तक्रारदार महिलेविरुध्द फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; एकाला अटक

0
542

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणाऱ्या एका महिले विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा आरोपींनी रविवारी (दि.१) फेसबुकवर महिलेविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.

रवींद्र शिंदे (रा. पिंपरी) आणि दिगंबर पडवळ (रा. लोणावळा) असे फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या इसमांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ३९ वर्षीय महिलेने कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्या महिलेविरोधात रवींद्र आणि दिगंबर यांनी रविवारी (दि.१) फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. हे लक्षात येताच महिलेने मंगळवारी (दि.३) याप्रकरणी त्या दोघांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यातील आरोपी रवींद्र शिंदे याला पोलीसांनी पिंपरीतून अटक केली आहे तर दिगंबर अद्याप फरार आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.