पिंपरीत कॅन्सरग्रस्त रुग्णाची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या

413

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरीतील एका कॅन्सरग्रस्त रुग्णाने राहत्या घरातील तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. ही घटना आज (बुधवार) सकाळी अकराच्या सुमारास पिंपरीतील सुदर्शन चौकातील सनराईज अपार्टमेंट येथे घडली.

इंद्रजित रुपचंद्र पवार (वय ५२, रा. सुदर्शन चौक, सनराईज अपार्टमेंट, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत इंद्रजित पवार गेल्या काही दिवसांपासून कॅन्सर या घातक आजारापासून त्रस्त होते. या आजारपणाला वैतागून आज सकाळी अकराच्या सुमारास इंद्रजित यांनी पिंपरी येथील सनराईज अपार्टमेंट या त्यांच्या राहत्या घरातील तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.