पिंपरीत ‘उजाले उनकी यादोंके’ संगीत कार्यक्रम उत्साहात

92

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – गायक मुकेश, मोहम्मद रफी, मन्नाडे, किशोरकुमार, महेंद्र कपूर, यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी ‘ मुरादकाझी’ आजोजित ‘उजाले उनकी यादोंके’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राजू जाधव, पी.चंद्रा, पिंपरी-चिंचवड कलाकार संघाचे अध्यक्ष विजय उलपे, खजिनदार राजू डेव्हीड, शामचंदन शिव, सचिव गायिका माधुरी आंबेकर आदी उपस्थित होते.

यावेळी घेतलेल्या गायकांच्या ऑडीशन चाचणीत सुनिल काची, नितीन कदम, आतिश टिळेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर राजेश्वर ठाकूर, बाळकृष्ण कांबळे, लाखन रावळकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

रविंद्र कांबळे, रवी पिल्ले, मुराद काझी, पी.चंद्रा यांनी ‘बने चाहे दुश्मन’ आणि ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ ही गीते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैलेश घावटे, केशव त्रिभुवन, विठ्ठल भिसे, वसंत कांबळे (कोल्हापूर) यांनी परिश्रम घेतले.