पिंपरीतून अपहरण करून तरुणाचा खून

1158

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी येथे केक कापून वाढदिवस साजरा झाल्यानंतर वाढदिवसाला आलेल्या तरूणाने अपहरण करून तरूणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास समोर आला आहे. दरम्यान, आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे.

आदित्य खोत (वय २५, रा. पिंपरी) असे अपहपरण करून खून केलेल्या तरूणाचे नाव आहे. तर पोलिसांनी पिंपरी येथील त्याचे मित्र जतीन मेवाती, मोनू टाक आणि इतरांवर संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, आदित्य बेपत्ता असल्याची तक्रार पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य याच्या मित्राचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यामुळे सर्वजण पिंपरीतील सुभाषनगर येथील घाटावर रात्री भेटले. याठिकाणी जतीन त्याचे इतर मित्र आणि आदित्य हे सगळे होते. या ठिकाणी वाढदिवस साजरा केल्यानंतर बडे पार्टी जायचे आहे, असा बहाणा करण्यातआ आला. जबरदस्तीने आदित्यला दुचाकीवर बसवून नेण्यात आले. लवळे येथील सिम्बॉयसेस कॉलेज रस्त्त्याने नांदेगाव परिसरात त्याला नेण्यात आले. रस्त्यावर दुचाकी थांबवून त्याला डोंगरात नेला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने व धारदार हत्याराने मानेवर आणि डोक्यात वार करण्यात आले. यावेळी आदित्य हा मला सोडा अशी गयावया करत होता. मात्र आदित्यचा काटा काढायचे डोक्यात ठेवून आलेल्यांनी त्याचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात आदित्य बेशुद्ध पडल्यानंतर तेथून मित्रांनी पळ काढला.

दरम्यान, नांदेगाव डोंगरात एकाचा खून करुन मृतदेह आणून टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आज (शुक्रवारी)  सकाळी साडेआठच्या सुमारास नांदेगाव डोंगरात आदित्यचा मृतदेह आढळला. मात्र खूनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, आदित्य दोन दिवस होऊनही घरी न आल्याने त्याची आई नातेवाईकांनी पिंपरी पोलिस ठाणे गाठले. पिंपरी पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिस तपास करत आहेत.