पिंपरीतील हितेश मुलचंदानी खुन प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक

277

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – हॉटेलसमोर झालेल्या किरकोळ वादातून मंगळवार (दि.२३ जुलै) पिंपरीतील हितेश मुलचंदानी या तरुणाचे अपहरण करुन खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. तर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा बऱ्याच दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली आहे.

शहाबाज शिराज कुरेशी (रा. कासारवाडी) असे अटक करण्यात आलेल्या या सराईत आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी त्याला सोमवारी (दि. १२) अटक केली. आरोपी शहाबाज कुरेशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खडकी आणि भोसरी पोलिस ठाण्यात एकूण १६ गुन्ह्यांची नोंद आहे. शहाबाजचे वडील देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मोक्‍का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. बकर्‍या चोरून विक्री करणारे बापलेक म्हणून त्यांची ओळख आहे.