पिंपरीतील शीतळादेवी मंदिरात चोरी; चांदीचा मुकूट आणि दानपेटी चोरट्यांनी केली लंपास

117

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – शहरातील वाहन चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली असताना आता चोरट्यांनी मंदिरांकडे आपला मोर्चा वळवला आहे. पिंपरीतील शीतळादेवी मंदिरात अज्ञात दोन चोरट्यांनी देवीचा चांदीचा मुकूट आणि दानपेटी चोरुन नेली आहे.  ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

याप्रकरणी रोहन नंदकुमार हराळे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीत शितळादेवीचे मंदिर आहे. अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवरुन येवून रात्रीच्या सुमारास या मंदिराची रेखी केली. त्यानंतर मंदिराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच देवीचा १५ हजार रुपये किमतीचा मुकूट आणि दानपेटी चोरुन नेली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पिंपरी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.