पिंपरीतील शगुनचौक, भाटनगर, वैशालीनगर, मोरवाडीतील ओव्हर ब्रिजवर इंदिरा गांधींच्या नावाची पाटी लावण्याची मागणी

202

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरीतील शगुनचौक, भाटनगर, वैशालीनगर व मोरवाडी येथील ओव्हर ब्रिजची दुरुस्ती करण्यात यावी, तसेच महापालिकेने माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली आहे. त्यामुळे, त्यांच्या नावाची पाटी ओव्हर ब्रिजवर झळकूल येईल अशा ठिकाणी लावावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतिने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण आष्टेकर यांच्याकडे केली आहे.  

यावेळी उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालीया, पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अॅड.मोहम्मद तारिक रिजवी, शहराध्यक्ष शाहाबुद्दीन एम.शेख, उपाध्यक्ष रहीम सय्यद, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष फय्याज शेख आदी उपस्थित होते.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरीतील शागुन चौक, भाटनगर, वैशालीनगर व मोरवडी येथील ओव्हर ब्रिजची तोडफोड झाली आहे. त्यामुळे ही सर्व ब्रिज दुरुस्ती करण्यात यावेत. शिवाय, महापालिकेने माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची पाटी ओव्हर ब्रिजवर झळकूल येईल अशा ठिकाणी लावण्यात यावी, अन्यथा शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या नावाची पाठी लावण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.