पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतल्याने रुग्णाचा मृत्यू

530

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतल्याने एका रुग्णाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.  ही घटना आज (सोमवार) सकाळी सातच्या सुमारास घडली.

शंकर पात्रे (वय ४५) असे मृत इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती, आज सोमवार सकाळी सातच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतल्याने शंकर पात्रे या रुग्णाचा मृत्यू झाला. शुक्रवार (दि.३) त्यांना दारुचे व्यसन असल्या कारणाने वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज (सोमवार) पहाटे त्यांनी रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बाहेर जाता आले नाही. यामुळे त्यांनी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील डक्टमधून खाली उडी घेतली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केली कि पळून जाण्याच्या प्रयत्नात त्यांना जीव गमवावा लागला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.