पिंपरीतील वल्लभनगर आगारात रक्षाबंधन निमित्त राखी बांधून प्लॅस्टिक मुक्तीची जनजागृती

40

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून वल्लभनगर आगारामध्ये चालक, वाहक आणि प्रवाशांना राखी बांधून कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, प्लॅस्टिक मुक्ती जनजागृतीसाठी हा उपक्रम राबविला गेला असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यावेळी आगार व्यवस्थापक संजय भोसले, स्थानक प्रमुख पल्लवी पाटील, मनिषा पवार, कल्पना वगनवार, आश्विनी गायकवाड, प्रतिभा भोवरे, छाया सुतार, पोर्णिमा होंदकनसे, अपर्णा फडतरे, चंद्रकांत थोपटे, एसटी वाहक, चालक आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मल जगताप, संगिता जैन, जयश्री वीरकर, सुरेखा वाडेकर, उर्मिला चौरे, निरजा देशपांडे, उमा मारकंडे, यांनी सहकार्य केले.