पिंपरीतील लॉजमध्ये दारूच्या अतिसेवनाने एकाचा मृत्यू

315

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरीतील इंद्रालोक लॉजमध्ये आज (सोमवारी) दुपारी साडेबारच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याचा मृत्यू हा दारूच्या अतिसेवणामुळे झाल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

प्रीतपाल सिंह गील (वय ५५, रा. पंजाब) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो गेल्या तीन दिवसापासून लॉजमध्ये राहात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रीतपाल सिंह गील यांचे पिंपरीतील नेहरूनगरमध्ये घर आहे.  ते भाड्याने दिले आहे. त्यामुळे ते गेल्या तीन दिवसांपासून पिंपरीमध्ये आले होते. त्यांना दारूचे व्यसन होते. आज (सोमवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा मृतदेह रस्त्या खोलीत आढळून आला. दारूच्या अतिसेवनाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात काही घातपात किंवा आत्महत्याचा संशय नाही, असे देखील पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिस तपास करत आहेत.