पिंपरीतील मुख्य चौकात कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

75

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरीतील मुख्य चौक असलेल्या आंबेडकर चौकात एका कारने दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 22) सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घडला.

अरुण कांबळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत स्वप्निल अरुण कांबळे (वय 28, रा. भीमनगर, पिंपरी गाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एम एच 14 / जे ई 8238) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास कामावर जात होते. त्यावेळी आंबेडकर चौकात त्यांना पाठीमागून येणाऱ्या कारने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये फिर्यादी यांच्या गाडीचे नुकसान झाले. तसेच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देता कार चालक घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare