पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटीलमध्ये ७ एप्रिलपासून आरोग्य तपासणी शिबिर

68

जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने  पिंपरीतील संत तुकारामनगर येथे ७ ते २८ एप्रिल या कालावधीत सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात दमा, हृदयरोग, श्वसनासंदर्भातील विकार, मधुमेह, पोटाविकार, मानसिक आजार, मेंदूविकार, मूळव्याध, हर्निया, मुतखडा, व्हेरीकोजवेन्स, अपेंडिक्स, विविध प्रकारच्या गाठी, टॉन्सिल्स, हायड्रोसिल, गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्याचे विकार, स्त्रियांचे विकार, स्तनाचे रोग, मासिक पाळीच्या समस्या, मातृवंध्यत्व, पांढरे जाणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मॅमोग्राफी, पॅपस्मियर,  कर्करोग तपासणी आणि बालकांचे विकार उंची व वजन न वाढणे, कुपोषण, भूक न लागणे, सतत रडणे, पोटदुखी, जंत, आकडी येणे आदी व्याधींची मोफत तपासणी व डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

पुढील उपचारासाठी आंतररुग्ण विभागात रुग्णाच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांनी रेशनकार्ड सोबत आणावे. सर्वांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे ” या उद्देशाने हे शिबिर घेण्यात येत आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजन करण्यात आलेल्या शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी सहभागी व्हावे असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. राजेश सिंग ९८६०१८८४०६ तसेच ०२० २७८०५९०० या क्रमांकावर संपर्क साधावा.